सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

लिटल फ्लॉवर बाल विहार चे विसावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

MSK    14-04-2024 20:45:44

*लिटल फ्लॉवर बाल विहार चे विसावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न* 

लातूर येथील मंठाळे नगर भागातील लिटल फ्लॉवर बालविहार चे विसावे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच स्व. दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लातूर शहराचे माजी महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे , श्री चंन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेजचे श्री भीमाशंकर देवणीकर , बालविहारच्या संचालिका सौ शिवलीला चोळखणे,  श्री विजय चोळखणे आदी मान्यवर उपस्थित होते.

बालविहारच्या सुमारे तीन ते सहा वयोगटाच्या चिमुकल्या बालकांनी सादरीकण केले. सीता अपहरण , शिवतांडव तसेच मोबाईलचे दुष्परिणाम , १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचन आदी विषयावरील चिमुकल्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. स्नेह सम्मेलनात बालकांसोबत त्यांची आई व आजींनाही सहभागी करून एक सुंदर व नाविन्यपूर्ण सादरीकरण करण्यात आले व आजी आजोबा हे कुटुंबातील महत्त्वाच्या घटक आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे यांनी बालविहारच्या प्रगती बद्दल गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पाश्चात देशात बालशिक्षणास उच्चशिक्षणा इतकेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्त्व असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुमार गणाचार्य व श्री बालाजी सुळ यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विजय चोळखणे यांनी केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती