सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

पुन्हा 'हे मन बावरे' मधील कलाकार येणार एकत्र ? अभिनेत्याच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण

पुजा    15-04-2024 15:06:48

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहोचला आणि अल्पावधीतच त्याला लोकप्रियता मिळाली. शशांक उत्तम अभिनय आणि चार्मिंग लुकच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. याच वाहिनीवरील 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधून अभिनेत्री मृणाल दुसानिस ही घराघरात पोहचली. त्यानंतर २०१८मध्ये कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतून मुख्य भूमिकेतून समोर आले. आजही प्रेक्षकांची ही मालिका  लाडकी आहे. सिद्धार्थ-अनुची गोड प्रेमकथा असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. २०२० मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आजही अनेकजण ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका आवर्जून बघतात. 

दरम्यान, ४ वर्षांनी पुन्हा शशांक आणि मृणाल एकत्र दिसले आहेत. शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मृणालसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोचं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतंय. 'सिद्धार्थ मिट्स अनु!.. हे मन बावरे ही मालिका संपून ४ वर्ष झाली, पण "अजूनही परत परत बघतो" अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते, आजही! मग मंडळी, ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का?' असं कॅप्शन शशांकने टाकलंय. त्याच्या या कॅप्शनमुळे शशांक आणि मृणाल पुन्हा एकत्र दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 

शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी होकार दिला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत 'नक्कीच आवडेल', 'ऑल टाईम फेव्हरेट जोडी', 'खूप एक्साइटेड आहोत' अशा प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. तर अनेकांनी ही मालिका पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोणता नवीन प्रोजेक्ट ही जोडी घेऊन येतेय याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

'हे मन बावरे' या मालिकेनंतर मृणाल अभिनय क्षेत्रापासून दूर होती. लग्नानंतर ती पतीसोबत अमेरिकेला स्थायिक झाली आणि त्यानंतर आई झाल्यामुळे तिनं ब्रेक घेतला. आता जवळ जवळ मृणालच्या लेकीचा नुरवीचा जन्म झाल्यनंतर चार वर्षांनी पुन्हा भारतात परतली आहे आणि आता ती कायमची इथेच राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर ती पुन्हा कमबॅक करेल अशा चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे शशांक केतकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' या मालिकेतून झळकतोय. त्याची ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडतेय.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती