सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा आरोप ;रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; पुणे, मुंबईसह राज्यभरात खळबळ
  • मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
  • : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
  • “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप
  • : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद
  • महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे
  • गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य
  पर्यटन

चारधाम प्रवास वर्णन, भाग ६ - उमेश कुगांवकर, ठाणे

डिजिटल पुणे    5670   02-07-2021 07:40:11

उमेश कुगांवकर

 भाग ५ पासून पुढे

पहाटेच्या वेळी चालताना प्रचंड उत्साह येतो. रस्त्यावर रहदारी नसते, लाईट सुद्धा नसते, आपलाच श्वास स्पष्टपणे आपणास ऐकू येतो. भयाण शांतता असते, तरीही निर्भयपणे आम्ही चालत होतो, एकमेकांशी बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता.. जो तो आपल्याच ' मूड ' मध्ये आम्ही चालत होतो.. सर्वात शेवटी मी असे... तरीही दोघांचे लक्ष माझ्याकडे असे, अधून मधून मला हातवारे करीत.

 

    सात आठ नंतर रहदारी सुरू होत होती.. जवळून एखादे जरी वाहन गेले तरी त्याच्या आवाजाने थरकाप उडे, विशेषता ट्रक च्या आवाजाने धडकी भरे...रस्त्यावर वेगवेगळ्या रंगाची वृक्षवल्ली पाहून मला मजा वाटायची..आम्ही काही ट्रेकर नव्हतो.. तरीही चालत होतो. आज पर्यंत भरपूर भटकंती केल्यामुळे थोडाफार चाललो होतो, नाही असं नाही...

सिंहगड, रायगड वर चढाया केल्या होत्या.. महाराष्ट्रातल्या 'सर्वोच्च शिखर' कळसुबाई वर निवृत्तीनंतर भोज्जा करून आलो होतो.. व्हॅली ऑफ फ्लावर ला गेलो तेव्हा हेमकुंड साहेबा पर्वत भर पावसात चढलो होतो... युरोप पाहताना सुद्धा पायपीट केली होती ती वेगळीच

 आणि इतर बरच काही... चालणं चालणं आणि चालणं.. आमच्या दोन पायांच्या गाडीला GPS तर अजिबात नव्हता.. रस्त्यात भेटणारी पहाडी माणसं आणि हॉटेल मालक हेच आमचे जीपीएस.

 फक्त ध्येय एकच चारधाम यात्रा, काम ,काळ, वेग याचं गणित आमच्याकडे नव्हत फक्त जमेल तेवढं चालायचं एवढच सूत्र ठरल होत.दरमजल करत पुढे पुढे जात होतो... दोन-तीन दिवस झाले असतील पण एक वेगळीच समस्या निर्माण झाली.. तीही नैसर्गिक..

नेहमीप्रमाणे पहाटे साडेचारला उठलो. सकाळचे विधी आटपून चहा बिस्कीट घेऊन बाहेर पडलो.. आणि चालू लागलो. आज जरा जास्तच धुकं वाटत होतं.तरीही आम्ही नेटानं चालत होतों. थंड वातावरणामुळे चालावं असं वाटत होतं... आत्ता कुठे आम्हीही रंगात आलो होतो अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. पण दाट धुक्यामुळे पुढचं काहीच दिसत नव्हतं. सकाळचे नऊ वाजून गेले तेव्हा कुठे जीवात जीव आला.एका ठिकाणी परत एकदा चहापाणी झाले. मी आणि मोहन केळकर चहा जास्तच घेत होतो.. मज्जा येत होती.. पुढे पुढे तर वेगळीच समस्या आली.. सगळीकडे धूर धूर दिसू लागला होता. अगदी सूर्य देखील दिसेनासा झाला.. कुठेतरी प्रचंड 'वणवा'पेटला होता.. अन वाऱ्यामुळे धूर सर्वत्र पसरला होता.. थोड्यावेळाने तर

 आमच्या समोरही आगीचे लोट दिसू लागले होते.. या भागात असे वणवे नेहमीच लावतात किंवा लागतात. खरं-खोटं देवाला माहिती... पण आमच्या समोर मात्र एक माणूस आग लावून गेलेला आम्ही पाहिला.. आता लोक म्हणतात, " सिगारेट,बिडी मुळे असे वणवे पेटतात.. आम्हाला मात्र ते खरं वाटत नव्हतं

आजचा दिवस मला तर काहीच फोटो काढता आले नाही.. सगळीकडे धूर धूर.. फोटो तरी काय काढणार? तरीही आम्ही चालत होतों. शेवटी दोन वाजता एका ठिकाणी थांबलो. रस्त्यावरील वाहतूक सुद्धा हळूहळू जात होती.. आम्ही सुद्धा घाबरलो होतो.. रस्त्यात एखादा गाव लागला तर तिथल्या लोकांना आगी बद्दल विचारत होतो, ते सुद्धा उडवा उडवीची उत्तरे देत होते.. शेवटी मी कॅमेरा बॅगेत ठेवला... सकाळी धुकं आणि दुपारी वणवा.. वारा मात्र तुफान होता.. पण सर्वत्र धूर धूर. या परिस्थितीत चक्क दोन दिवस गेले.. मी तर फोटोग्राफी करण्यासाठीच चालत होतो अन हें काय दिसतय?

 रात्री तर आणखी भयानक परिस्थिती दिसत होती... टीव्हीवर बातम्या सुद्धा दाखवत होते. उत्तराखंड, नैनिताल भागात सुद्धा वणवे पेटले होते.. लष्कराला मदतीला घेतले होते.. वणवे विजवण्यासाठी. गेल्या पन्नास वर्षात असं कधी घडलं नव्हतं ते आता दिसत होत.

मंग आता याला उपाय काय? एका वृद्ध माणसाने सांगितलं,' डरो मत बारिश आयेगा तों सब धुवा नीचे बैठ जायेगा '.. ' लेकिन बारिश कब आएगा?' आमचा प्रश्न. तों नुसताच हसला.. आम्ही त्याच्या तोंडाकडे नुसते पहात राहिलो.. त्यामुळे आमचा 'मुड ' आणि उत्साह कमी झाला होता.. पण उन्हाची तीव्रता कमी भासत होती.. पण वातावरण गढूळ झाले होते..

 मला तर परत फिरावसं वाटतं होतं.असं प्रथमच पाहत होतो.. आगळवेगळ.. जगावेगळं.. असं काही होईल याचा विचार सुद्धा केला नव्हता... आज पर्यंत अमेरिकेत जंगलाला आग लागल्याच्या बातम्या फक्त ऐकल्या होत्या.. आणि आता प्रत्यक्ष अनुभव घेत होतो..कस होणार? तरीही पुढे जायचं असा आमचा निर्धार ठरला..

            क्रमश:

Advertisement


 Give Feedback



 जाहिराती