मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दुसरीकडे मनसे आणि भाजपमध्येही वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू असताना आता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील भूंखंडांच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात ठाकरे गट आणि भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे हे मुंबईतील विविध भूखंडांवर होत असलेल्या कथित घोटाळ्यांचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. “उद्धव ठाकरे यांच्या विचारांमध्ये नेहमी ‘जमीन’ आणि ‘लँड स्कॅम’ हेच चालू असते,” अशी जहाल टीकाही त्यांनी केली. गरवारे क्लबमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यशाळेत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. आशिष शेलार म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी नवीन काही बोलायचं सोडून दिलं आहे. आता ते सतत अमुक जमीन अदानीला दिली, तमुक जमीन अंबानीला दिली अशा आरोपांमध्येच अडकून पडले आहेत.”
काही दिवसांपूर्वी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांबाबत वक्तव्य करत ‘वैयक्तिक मैत्री बाजूला ठेवली आहे’ असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट शब्दांचा वार केला आहे. आशिष शेलार म्हणाले, 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. पण आज मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागेलासाठीही लाखो रुपये मोजावे लागतात. महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता असताना त्यांनी बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात दिले होते. ते आम्हाला काय जाब विचारतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
वक्फ सुधारणा कायद्याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. तुम्ची संपत्ती, मशिदी, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. पण आपल्या देशात कायदा असल्याने तसे करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी करण्यात आले आहे. वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मु्लिमांनीदेखील पुढे येऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे. जे मुस्लिम समाजाला वोट बॅं समजतात, तेच या कायद्याला विरोध करत आहे. पण आम्ही यांचे पितळ उघडे पाडणार आहोत. कायदा संमत झाला आहे. आता आम्ही नियम बनवणार आहोत. त्यानंतर गरीब मुस्लिमांना कसा फायदा होणार, यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत, असं शेलार यांनी म्हटलं आहे.
आशिष शेलार म्हणाले, 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. पण आज मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागेलासाठीही लाखो रुपये मोजावे लागतात. महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता असताना त्यांनी बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात दिले होते. ते आम्हाला काय जाब विचारतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. वक्फ सुधारणा कायद्याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. तुमची संपत्ती, मशिदी, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. पण आपल्या देशात कायदा असल्याने तसे करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी करण्यात आले आहे.
वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मु्लिमांनीदेखील पुढे येऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे. जे मुस्लिम समाजाला वोट बॅंक समजतात, तेच या कायद्याला विरोध करत आहे. पण आम्ही यांचे पितळ उघडे पाडणार आहोत. कायदा संमत झाला आहे. आता आम्ही नियम बनवणार आहोत. त्यानंतर गरीब मुस्लिमांना कसा फायदा होणार, यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत, असं शेलार यांनी म्हटलं आहे.