सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण

डिजिटल पुणे    28-04-2025 16:04:29

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतिष चव्हाण, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर,  संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांना यंत्रप्रणालीची माहिती दिली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीत इमारतीचेही लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ट्रू बीम लिनियर ॲक्सलेटर प्रणाली

शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या रेडिएशन ऑनकोलॅाजी विभागात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

रेडिएशन ऑनकोलॅाजी विभाग वर्ष १९८१ पासून कर्करूग्णांच्या सेवेत आहे.

प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात.

या रुग्णालयात महात्मा जोतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातात.

वाढती कर्करुग्णसंख्या व अद्ययावत उपचारप्रणाली विकसित होत असल्याने महाराष्ट्र शासनाने दि.२१ सप्टेंबर २०१२ पासून स्वतंत्रपणे समर्पित कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१६ मध्ये राज्य कर्करोग संस्था म्हणून मान्यता दिली आहे.

दिवसेंदिवस कर्करुग्णसंख्या वाढत असल्यामुळे शासनाने रुग्णालयात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली दि ३.१०.२०२४ पासून कार्यान्वित केली आहे.

ट्रू बीम तंत्रज्ञानः-व्हेरियन ट्रूबीम (True Beam) हे अत्याधुनिक मेडिकल लिनियर अॅक्सलरेटर असून त्याची किंमत अंदाजे २५ कोटी रुपये आहे.

ही प्रणाली अचूक, नावीन्यपूर्ण आणि प्रगत रेडिएशन उपचार प्रदान करते.

हे संयंत्र इमेज-गाइडेड रेडिओथेरपी (IGRT) आणि (IMRT) यासह प्रगत उपचार पर्यायांची विस्तृत श्रेणी देते.

ही लवचिकता डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजेनुसार क्लिष्ट ठिकाणी असणाऱ्या कर्करोगाच्या गाठीवर उपचार करण्यास सुलभता देते.

TrueBeam हे रूग्ण-केंद्रित उपचार मशीन आहे जे रूग्णाला आरामदायी आणि अत्यंत जटिल रेडिएशन योजना अचूकपणे वितरीत करून उपचार प्रदान करते.

यामुळे उत्कृष्ट कार्यक्षमतेने आणि सातत्यपूर्ण उच्च-गुणवत्तेचे उपचार केले जातात.

डोके आणि मान, मेंदू, स्तन, फुफ्फुस, अन्ननलिका, प्रोस्टेट आणि गर्भाशय यासह शरीरात कोठेही अत्यंत अचूक रेडिएशन उपचार प्रदान करते.

पिनपॉइंट पोझिशनिंग, उच्च-गुणवत्तेचे सीटी इमेजिंग आणि ३६०-डिग्री रोटेशनल ही वैशिष्ट्ये आहेत.

सीटी सिम्युलेटर (CT Simulator) तंत्र : – किरणोपचार विभागात रेडिएशन उपचार करण्यापूर्वी कर्करुग्णांचे 3D सिम्युलेशन करण्यासाठी LINAC संयंत्राचे संलग्न संयंत्र म्हणून सिटी सिम्युलेटर महत्वाचे आहे. सिटी इमेजेस वर कॅन्सर आजाराचे कंटूरिंग केल्यानंतर ट्रीटमेंट प्लॅनिंग करून Linac संयंत्रवर किरणोपचार केले जातात.


 Give Feedback



 जाहिराती