सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

उरण मधील मुस्लिम बांधवांतर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा रॅली द्वारे निषेध! दहशदवाद्याना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    28-04-2025 17:09:30

उरण : उरण तालुक्यातील मुस्लिम समाज, मुस्लिम बांधव हे शांतताप्रिय व देशप्रेमी असून पूर्वीपासूनच उरण मधील मुस्लिम समाज समता, बंधुता, एकता,सर्व धर्म समभाव,समानता आदी मानवतेची मूल्ये जोपासत आला आहे.भारताच्या प्रत्येक उपक्रमात, सुख दुःखात मुस्लिम समाज नेहमी सहभागी होत असतात. भारतातील काश्मीर राज्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ हुन अधिक निष्पाप भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला. २६ हुन अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याने भारत देश व इतर अन्य विविध देशाने सुद्धा हळहळ व्यक्त करत शोक व्यक्त केला.

सदर दहशतवादी हल्ल्यामुळे भारतातील नागरिकांमध्ये दहशतवादी विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दहशतवादी विरोधात संपूर्ण भारतात व महाराष्ट्र राज्यातही सर्वत्र निषेध, बैठका, लॉंग मार्च, कॅण्डल मार्च काढले गेले. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे राहणारे, एकनिष्ठ देशभक्त असलेले मुस्लिम बांधवांतर्फे दहशदवाद्यांचा निषेध करण्यात आला. रॅली काढून व पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मुस्लिम समाजाने आपला संताप व्यक्त केला. उरण शहरातील मस्जिद मोहल्ला ते गांधी पुतळा, जरी मरी मंदिर बाझारपेठ, उरण पोलीस स्टेशन या मार्गावर हातात बॅनर घेऊन रॅली काढून निषेध करण्यात आला.

शेवटी उरण पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दहशतवादी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे कर्ते, त्याचे समर्थक आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या व्यक्तीना कायद्‌याच्या कठोर चौकटीत शिक्षा करावी.हुतात्म्यांच्या बलिदानाचा सूड घेण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित न्यायाच्या कक्षेत आणावे.हुतात्म्याप्रति एकता आणि त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ, शोक व्यक्त करण्यासाठी एक महिन्यासाठी सर्व अनावश्यक सरकारी कार्यक्रम स्थगित करण्याची घोषणा करावी,सरकारी आदेश (जी.आर.) जारी करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ३० दिवसांसाठी प्रतीकात्मक चिन्ह (जी.आर. मध्ये नमूद केलेले) परिधान करण्याचे आदेश द्यावेत,शोकाकुल भारतीय नागरिक म्हणून सामूहिक शोक आणि संकल्पासह सर्व गुन्हेगार आणि आणि त्यांना मदत करणाऱ्यांना पकडून त्यांना त्वरित शिक्षा करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी उरण तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती