सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

सोलापुरात आणखी एका डॉक्टरांची आत्महत्या

डिजिटल पुणे    29-04-2025 12:38:09

सोलापूर : सोलापुर येथे आणखी एका डॉक्टराने  आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिविल हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टरच्या बाबत सदरची घटना आहे. आदित्य नामबियर असे त्यांचे नाव असून रहिवास असलेल्या वस्तीगृहाच्या इमारतीत आत्महत्येचा प्रकार उजेडात आला आहे.शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या डॉक्टरांच्या वस्तीगृहातच ते राहत होते. हात आणि गळा चिरून घेऊन त्या डॉक्टरांनी स्वतःचे जीवन संपविल्याची बाब समोर आली आहे. 

सन २०१९ च्या शासकीय मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते.  डॉक्टरांनी आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्यांचा  मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये न्यायवैद्यक विभागात नेण्यात आला आहे. या घटनेनंतर वसतिगृहातील डॉक्टरांची सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्दी केली आहे. सदर बझार पोलिसांनी याची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती