पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा 'महावंदन एमसीए अवॉर्ड्स २०२५' हा सोहळा पुण्यात (पंडित फार्म) येथे पार पडला. सन २०२४ च्या क्रिकेट हंगामात क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या खेळाडूंना एमसीएच्या वतीने 'महावंदन एमसीए ॲवॉर्ड्स'ने गौरविण्यात आले. या सोहळ्याला आमदार रोहित पवार, छत्रपती युवराज संभाजी छत्रपती राजे आणि एमसीएचे सर्व ॲपेक्स बॉडी मेंबर उपस्थित होते.
यावेळी सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, विजेते संघ तसेच संघमालक व स्पॉन्सर्स यांचाही सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र, महालक्ष्मी अय्यर यांचा लाईव्ह परफॉर्मन्स, शर्वरी जेमिनीस यांची गणेश वंदना तर शाहीर रामानंद उगले यांचा पोवाडा हे अप्रतिम कार्यक्रम सादर करण्यात आला.याप्रसंगी बोलताना, आ.रोहित पवार म्हणाले यापुढे महाराष्ट्र क्रिकेटला अधिक व्यापक स्वरुप देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.