सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

चिखलीत लेबर कॅम्पमधील बेकायदा दारू अड्डा उध्वस्त! आमदार महेश लांडगेंच्या सुचनेनंतर पोलिसांची कारवाई

डिजिटल पुणे    03-05-2025 10:54:16

पिंपरी: चिखली येथील एका लेबर कॅम्पमध्ये देशी दारूचा अनधिकृत अड्डा चालवला जात होता. या ‘लेबर कॅम्प’ मध्ये तीन हजाराहून अधिक लेबर वास्तव्याला आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे या लेबर कॅम्पला लागूनच मोठी गृहनिर्माण वसाहत असून, या देशी दारूच्या अड्ड्यामुळे वारंवार  वादाचे प्रसंग उद्भवले जात होते. त्यामुळे सदर दारुचा अड्डा उध्वस्त करण्यात आला.

बेकायदेशीर दारुच्या अड्ड्यामुळे स्थानिक सोसायटीधारकांनी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुशंगाने आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना उचित कारवाई करण्याबाबत सूचना केली होती. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ दखल  घेऊन हा दारूचा अड्डा उखडून टाकला. या कारवाईमुळे येथील सोसायटी धारकांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास सोडला.

चिखली येथील हॅरिझन आणि लेगसी रिव्हरसाईड सोसायट्यांच्या मागे असलेल्या बेकायदेशीर देशी दारूचा अड्डा चालवला जात होता. या मजूर कॅम्पमध्ये साधारण दोन ते तीन हजार मजूर वास्तव्याला आहेत. या दारू दुकानात वारंवार वादाचे प्रसंग उद्भवतात. मद्यधुंद अवस्थेतील हे मजूर सोसायटी धारकांसमोर अश्लील वर्तन करतात आणि अपशब्द वापरतात. अनेक वेळा त्यांनी सोसायट्यांवर दगड फेकले. यामुळे विशेषतः महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी  असुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती.

लेबर कॅम्पमध्ये बांगलादेशी घुसखोर असण्याची शंका…

चिखलीच्या मध्यवस्तीत रहदारीच्या परिसरात असणाऱ्या या लेबर कॅम्प मधील मजुरांचे पोलीस सत्यापन आणि ओळख तपासणी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या कॅम्पमध्ये बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता देखील रहिवासांनी व्यक्त केली आहे आगामी काळात यांच्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये असे देखील नागरिकांनी म्हटले आहे.

नागरी मध्यवस्तीत, सोसायटीच्या आवारात दारूचे दुकान असल्यास नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत राज्य विधिमंडळात निर्णय झाला. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ दारु दुकाने काही दिवसांपूर्वी ‘सील’ करण्यात आली. आता मजुरांच्या लेबर कॅम्पमध्ये बेकायदेशीर दारू अड्डा चालवला जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या लेबर कॅम्पमध्ये बांगलादेशी घुसखोर असण्याची शंका स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे. त्याबद्दलही पोलिसांमार्फत ‘सर्च ऑपरेशन’ करण्याची मागणी केली आहे.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.


 Give Feedback



 जाहिराती