सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 व्यक्ती विशेष

बावनकुळेंचे विधान म्हणजे विचारांची नव्हे केवळ सत्तेसाठी ची लढाई हीच भाजप ची एकमेव दिशा

डिजिटल पुणे    05-05-2025 16:46:07

पुणे : भाजपचे बावनकुळे यांनी काल पुण्यात बोलताना काँग्रेस फोडा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून घ्या असे जाहीर आवाहन केले आहे. आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी यावर जोरदार टीका केली आहे. 

' एकेकाळी भाजप स्वतःला ' पार्टी विथ डिफरन्स ' म्हणून घेत असे आणि तत्त्वांवर चालणारी कार्यकर्त्यांची फळी असल्याचा दावा करीत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आयात उमेदवारांवरच भाजपचा भर दिसून आलेला आहे. आता उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनाही भाजप दरवाजे खुले करीत आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील हिंदुत्वाचा मुद्दा सोडता इतर कुठल्या मुद्द्यांच्या बाबतीत  मतभेद नाहीत हे उघड आहे. शिक्षण, आरोग्य,रोजगार आदी धोरणात्मक बाबींवर काम करताना काँग्रेसच्या कामगिरीत आणि भाजपच्या कामगिरीत फारसे उजवे डावे करता येणार नाही अशी स्थिती आहे.' असे आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती सरकार मधले पक्ष नावाने जरी वेगवेगळे असले तरी त्यातील अनेक मंत्री तेच आहेत. काँग्रेस मधीलच सरंजामदार आणि घराणेशाही असलेले नेते भाजपने उचलून त्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. त्यासाठी जरूर तिथे इडी सीबीआयचा वापर करूनही हे केले आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोदींच्या हुकूमशाही विरुद्ध लढणारे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस यांच्या मधला सेतू खुला झाला आहे. 

या पुढच्या राजकारणात आम आदमी पार्टी सारखा पर्याय जनतेच्या प्रश्नाला उत्तर काढू शकेल. राजकारणातील हा लढाईचा टप्पा कठोर परिश्रमाचा आहे परंतु स्थानिक निवडणुकीच्या द्वारे आम आदमी पार्टी हा  व्यवस्था परिवर्तनाचा पर्याय मतदारांसमोर उभा करेल असेही मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती