सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

डिजिटल पुणे    08-05-2025 17:59:19

नाशिक : महिला व बालकांच्या विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महिला व बालविकास विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिर घेतले जाते. या वर्षापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली.

राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषद, नाशिक यांच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरण व विविध शासकीय योजनांचा लाभ वितरण सोहळा आज सकाळी महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, कायनेटिक ग्रीनचे रितेश मंत्री आदी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ई पिंक रिक्षा नागपूर, पुणेनंतर नाशिक येथे वितरण होत आहे. या रिक्षामध्ये जीपीएस सिस्टिम कार्यान्वित करून दिली आहे. तसेच या महिलांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. या रिक्षांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. चार्जिंग केंद्रांवर महिलांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच या रिक्षांचा उबेर, ओला पोर्टलवर समावेशसाठी करार करण्यात येईल. याबरोबरच शक्य तेथे या रिक्षा चालक महिलांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

महिला व बालविकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थी आहेत. बाळाच्या नावासमोर प्रथम आईचे नाव लावणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून

अंगणवाडीत वीज, शौचालय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत थ्रीडी अंगणवाडीच्या उपक्रमाचे मंत्री कु. तटकरे यांनी कौतुक केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात महिला व बालविकास विभाग प्रथम आला. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. लेक लाडकी योजनेविषयी अधिकाधिक जनजागृती करावी, असेही आवाहन मंत्री कु. तटकरे यांन केले. मंत्री कु. तटकरे यांनी आदिशक्ती समिती, आदिशक्ती पुरस्कार याविषयी माहिती दिली.

आमदार श्री. भुजबळ म्हणाले की, राज्य शासनातर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या की, पिंक ई रिक्षा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. महिला सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरेल. सर्व अंगणवाडीत वीज जोडणी झाली आहे.  किलबिल उत्सव राबविण्यात येत आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पाठपुरावा संगणकीय प्रणालीची माहिती डॉ. राजेंद्र बागूल यांनी माहिती दिली. सहाय्यक आयुक्त श्री. पगारे यांनी आभार मानले. लेक लाडकी योजना लाभार्थी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थींना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे रूपे कार्ड वितरण, स्वयंम सहायता बचत गट, बचत गट लोगो अनावरण, बालविवाह प्रतिबंध कार्य केल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार, आशा स्वयंसेविका सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती