सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 जिल्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा नवा भारत आहे, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डिजिटल पुणे    10-05-2025 10:24:01

बीड  : -पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायचं काम भारत करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेला हा घुसके मारेंगे वाला भारत आहे.आमच्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम या दहशतवाद्यांनी केलं त्यासाठी ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले त्याचे मी स्वागत करतो. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायचं काम आमचे जवान करत आहेत या दरम्यान महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले त्यांना मी आदरांजली वाहतो असे म्हणत, केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी बैठक झाल्याचीदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बीडच्या तारकेश्वर गड येथे संत नारायण बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश धस, यांची प्रमुख उपस्थिती होती.. गडाच्या विकासासाठी आवश्यक ती मदत आपण करणार असल्याचा शब्द देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गडाचे महंत आदिनाथ महाराज यांना दिला..कार्यक्रमासाठी गडावरील हेलिपॅड वर त्यांचे आगमन झाले त्यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.


 Give Feedback



 जाहिराती