सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 जिल्हा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

डिजिटल पुणे    10-05-2025 15:07:28

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी आणि दळण- वळणाच्या सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करतानाच उपकेंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकीकृत विकास आराखड्याच्या प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्री श्री. पाटील यांनी आज दुपारी शिवनई शिवारातील उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष निकम, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, डॉ. राजेंद्र विखे पाटील, बागेश्री मंथळकर, देविदास वायदंडे, नितीन घोरपडे, संदीप पालवे, सिनेट सदस्य विजय सोनवणे, प्राचार्य श्री. भांबर, संपत काळे, सचिन गोरडे, बाकेराव बस्ते आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसराचा सर्वांगीण विकासाचे नियोजन करावे. त्यासाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा. उपकेंद्राच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घ्यावा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. वैद्य यांनी उपकेंद्राची माहिती देतानाच परिसरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.


 Give Feedback



 जाहिराती