सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 विश्लेषण

मुंबई, घाटकोपरचे मुरली नाईक आणि नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या दोन्ही लष्करी जवानांच्या बलिदानाला सलाम - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

डिजिटल पुणे    10-05-2025 16:13:26

मुंबई : मुंबई, घाटकोपरचे मुरली नाईक आणि नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या लष्करी जवानांना भारत पाकिस्तान युद्धादरम्यान कर्तव्यावर असताना सीमेवर वीरमरण आले. देशभरातून या दोन्ही जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या दोन्ही जवानांच्या बलिदानाला सलाम केला आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत म्हटले कि, मुंबई, घाटकोपरचे मुरली नाईक आणि नांदेडचे सचिन यादवराव वनंजे या लष्करी जवानांना कर्तव्यावर असताना सीमेवर वीरमरण आले. दोन्ही शहीद वीराना भावपूर्ण श्रद्धांजली. संपूर्ण भारत देश तुमच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुमच्या बलिदानाला माझा सलाम!, असे उद्गार पाटील यांनी काढले. 

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक हे शहीद झाले. उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानसोबत लढताना नाईक यांना वीरमरण आले आहे. भारतीय सैन्यांत देशसेवा बजावणाऱ्या शहीद मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना एक कॉल केला. आईने मुरली नाईक याला थांबविण्याचा प्रयत्नही केला. तो म्हणाला होता कि, देशाला माझी गरज आहे. ते माझं कर्तव्य आहे. मला जायलाच हवं. मी व्यवस्थित परत येईन. परंतु मुरली नाईक त्यांना पाकिस्तानी हल्ल्यात वीर मरण आले.  त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

६ मे रोजी जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं ८००० फूट खोल दरीत भारतीय सैन्य दलाचं वाहन कोसळल्यानं कर्तव्यावर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले २९ वर्षीय सचिन वनंजे यांना वीरमरण आलं. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये अपघातात वीरमरण आलेल्या नांदेडचे जवान सचिन वनंजे यांना शुक्रवारी  अखेरचा निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील देगलूर इथं शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी भारताच्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिक उपस्थित होते. आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन पत्नीनं आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला.


 Give Feedback



 जाहिराती