सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
 DIGITAL PUNE NEWS

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके

डिजिटल पुणे    14-05-2025 10:34:05

नवी दिल्ली :  खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये मुंबईच्या परिना राहुल मदान पोटरा हिने 3 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावून आपली क्षमता सिद्ध केली. तिने केलेल्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.खेलो इंडिया युथ गेम्स 2025 अंतर्गत दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यांमध्ये देशातील तरुण  जिम्नॅस्टिकस्‌नी कला, संतुलन आणि लयबद्धतेचा अप्रतिम संगम सादर केला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या परिना युवा खेळाडूने तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदक पटकावली तर दिल्लीची रेचलदीप हिने सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.

रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यांमध्ये महाराष्ट्राने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्यपदक आपल्या नावावर केले. तर दिल्लीने 1 रौप्य आणि 3 कांस्यपदके या स्पर्धेत मिळवली. हरियाणाने 1 कांस्य पदक मिळवण्यात यश मिळवले.

ऑल अराउंड फायनल: परिनाचे परफेक्शन, महाराष्ट्राचा दुहेरी विजय

31 जिम्नॅस्ट्कांमध्ये झालेल्या वैयक्तिक ऑल अराउंड फायनलमध्ये महाराष्ट्राच्या परिना हिने 83.650 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या सहकारी शुभाश्री उदयसिंह मोरे हिने 80.200 गुणांसह रौप्यपदक, तर दिल्लीच्या रेचल दीप  हिने 75.850 गुणांसह कांस्यपदक मिळवले.

हूप इव्हेंट: परिनाचे दुसरे सुवर्ण, दिल्लीला रौप्य

हूप इव्हेंटमध्ये परिनाने आपला दबदबा कायम ठेवत दुसरे सुवर्णपदक जिंकले. दिल्लीच्या रेचल दीपने रौप्यपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या देवांगी हर्षल पवार हिला कांस्यपदक मिळाले.

बॉल इव्हेंट: किमायाने चमक दाखवली, परिनाला रौप्य

बॉल इव्हेंटमध्ये महाराष्ट्राच्या किमाया अमलेश कार्ले ने सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या परिनाला  रौप्य, तर दिल्लीच्या रेचलने यावेळी कांस्यपदकाची कमाई केली.

रिबन इव्हेंट: परिनाचे तिसरे सुवर्ण, दिल्ली पुन्हा कांस्यवर

रिबन इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा परिनाने लयबद्ध प्रदर्शन करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. शुभाश्री हिला रौप्य, तर रेचल दीपने पुन्हा कांस्यपदक जिंकून दिल्लीसाठी गौरव मिळवला.

क्लब्स इव्हेंट: शुभाश्रीने दाखवली ताकद, हरियाणाच्या मिष्काने मिळवले स्थान

क्लब्स इव्हेंटच्या अंतिम सामन्यात शुभाश्री ने सुवर्णपदक, परिनाने रौप्य आणि  हरियाणाच्या मिष्का ने दिल्लीच्या रेचल दीपला मागे टाकत कांस्यपदक जिंकले.


 Give Feedback



 जाहिराती