छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.