पुणे : सुप्रसिद्ध अभिनेते श्री सचिन जी खेडेकर यांचा कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शांतीदूत परिवारातर्फे शांतीदूत कला रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी शांतीदूत परिवाराच्या ट्रस्टी डॉ. योगेश्वरी कराळे, शांतीदूत अभिनेत्री रोहिणी कोळेकर, सौ. सीमा ठुबे, सौ. शीतल चौधरी, मधू चौधरी, नितीन दुधाटे विजय ठुबे व डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से. नि. उपस्थित होते.शांतीदूत परिवार पदाधिकारी, सदस्य हितचिंतक, अधिकारी व मित्र परिवारासह अनेकांनी डॉ. विठ्ठल जाधव IPS, सौ. विद्या जाधव व शांतीदूत परिवाराचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
