सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

शांतीदूत परिवार व नाट्य रसिकांचे वतीने बाल गंधर्व रंग मंदिर येथे हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुले ,कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शांतीदूत सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरव

डिजिटल पुणे    23-06-2025 11:05:06

पुणे : सुप्रसिद्ध अभिनेते श्री समीर जी चौघुले (महाराष्ट्राची हास्यजत्रा व सम्या सम्या मैफिलीत माझ्या फेम) यांचा शांतीदूत परिवार व नाट्य रसिकांचे वतीने बाल गंधर्व रंग मंदिर येथे डॉ विठ्ठल जाधव IPS, विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से.नि. मार्गदर्शक शांतीदूत परिवार यांचे हस्ते,कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शांतीदूत सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कोविड च्या भयंकर तणावाच्या काळात समीर चौघुले जी व संपूर्ण हास्यजत्रा कलाकारा नी रसिकांना आनंदाचे क्षण उपलब्ध करून दिले.समीर जी व संपूर्ण टीम चे हे ऋण अविस्मरणीय आहेत. पुनश्च एकदा शांतीदूत परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा . या वेळी शांतीदूत प्रा. इंद्रजीत भोसले, प्रा विलास कदम लातूर, मधुकर चौधरी, नितीन दुधाटे व मितेश भोसले उपस्थित होते.

 

 

 

 


 Give Feedback



 जाहिराती