सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा

डिजिटल पुणे    26-06-2025 14:40:46

मुंबई : राज्यात पहिली इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

"या मोर्चाला कोणताही पक्षीय झेंडा नसेल. फक्त 'मराठी' हाच या मोर्चाचा अजेंडा असेल," असे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. “ही फक्त मनसेची लढाई नाही. राज्यातील प्रत्येक मराठी माणसाची ही लढाई आहे,” असे ते म्हणाले.

मनसेने जरी मोर्चाची घोषणा केली असली तरी त्याचे नेतृत्व कोणताही पक्ष करणार नसून मराठी माणूसच या लढ्याचे खरे नेतृत्व करणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी एक सूचक इशाराही दिला. "या मोर्चाला कोण येत नाही, हे मला पाहायचं आहे," असे सांगत त्यांनी कोणाला उद्देशून हे वक्तव्य केले यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेकांच्या मते, राज ठाकरे यांचा इशारा राज्यातील कलावंत, साहित्यिक आणि अभिनेते यांच्याकडे आहे, ज्यांनी याप्रकरणी अद्याप भूमिका घेतलेली नाही.राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला असून, हा मोर्चा किती मोठा आकार घेतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती