पुणे - सोनू निगम पासून आनंद शिंदे,आदर्श शिंदेसारख्या आघाडीच्या गायकांची भन्नाट गाणी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच राज्यभर गाजत असतानाच विश्वविख्यात पेन्सिल चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या नयनरम्य रंगसंगतीची अप्रतिम छाप असलेल्या "सजना" सिनेमाचा प्रीमियर शो काल पुण्यात सिटी प्राइड थिएटरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. दिग्दर्शक शशिकांत धोत्रे आणि त्याच्या टीमवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव झाला. सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघा आणि सजनाचा शेवट चुकवू नका.
सजना २७ जून पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात !