थेरगाव (पिंपरी-चिंचवड) – किंग मार्शल आर्ट्सच्या वतीने दिनांक २८ जून रोजी थेरगाव येथे बॅल्क बेल्ट ग्रेडिंग प्रशिक्षण शिबिर आणि डॅन ग्रेडिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ३० विद्यार्थी आणि प्रशिक्षकांनी सहभाग घेतला.या विशेष कार्यक्रमात किंग मार्शल आर्ट्सचे चार विद्यार्थी – श्रेया मेडशिगपाटील, अनमोल यादव, समिक्षा म्हमाणे आणि रुद्र शिर्के यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कराटेमधील बॅल्क बेल्ट पदवी मिळवली.या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना कराटेचे तांत्रिक कौशल्य, डॅन ग्रेडिंगची सखोल माहिती आणि शारीरिक क्षमतेचा विकास यावर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे मार्गदर्शन माजी पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, रुचित थोरवे तसेच किंग मार्शल आर्ट्सचे मुख्य कोच जयदेव म्हमाणे यांनी केले. प्रमुख प्रशिक्षक म्हणून समृद्धी म्हमाणे, रोहन गायकवाड, हर्ष मोरे आणि इतर प्रशिक्षक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन अविनाश रानवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सुशांत पाडे यांनी देखील आयोजनात मोलाचा सहभाग दिला.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या कराटे क्षेत्रातील प्रगतीला नवे बळ देणारा ठरला आहे.