पुणे : शांतीदूत परिवारातर्फे टिळक स्मारक मंदिर पुणे येथे सुप्रसिध्द अभिनेत्री नम्रता सभेराव व सुप्रसिध्द अभिनेते प्रसाद खांडेकर यांचा डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से. नि. मार्गदर्शक शांतीदूत परिवार व सौ. विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार यांच्या हस्ते कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शांतीदूत सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी शांतीदूत परिवार पुणे अध्यक्षा अभिनेत्री रोहिणी कोळेकर, सचिव सुरेश भाऊ सकपाळ ,शांतीदूत परिवार शिवाजी नगर अध्यक्ष मधू चौधरी व शांतीदूत नितीन दुधाटे यांनी चित्रकाव्य व हलके फुलके पुस्तके शांतीदूत परिवार उपरणे व तुळशी रोप देऊन त्यांचा सत्कार केला.
शांतीदूत परिवारातर्फे अभिनेत्री नम्रता सभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा