मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीणचा मागील आणि नवीन हप्ता आजपासून मिळणार आहे अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. लाडकी बहीणच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 3600 कोटी मंजूर केले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनात सादर होणाऱ्या प्रत्येक विधेयकावर सखोल चर्चा व्हावी, कोणतेही विधेयक चर्चेशिवाय मंजूर होऊ नये, अशी शासनाची भूमिका आहे. विधिमंडळ सदस्यांना त्यांच्या मतदारसंघांतील प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि सभागृहाचा एकही मिनिट वाया जाणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल. आजपासून तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या पुरवणी मागण्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून आज त्या सभागृहात सादर केले जाणार आहे, अशी माहिती आजिर पवार यांनी दिली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या लाडक्या बहिणींकरिता पुढील हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल. अजित पवारांच्या या घोषणेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. खरंतर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असा दावा करण्यात आला होता. जून महिन्याच्या हफ्त्याला उशीर होत असल्याने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबत दिले जातील असे म्हटले जात होते, परतू आता अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे आजपासुन महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.
दरम्यान, आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आता या योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हि कधीही बंद होणार नाही, तर ती इथून पुढेही अशीच सुरू राहील असं सरकार कडून सातत्याने सांगितलं जात आहे.
यंदा प्रथमच जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने राज्यातील धरणाच्या पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. तर राज्यात काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.