सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 क्राईम

धक्कादायक! पुण्यात डिलिव्हरी बॉयने 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून केला अत्याचार,घटनेनंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी ,मी पुन्हा येईन'चा मेसेज!

डिजिटल पुणे    03-07-2025 11:17:49

पुणे :  पुणे शहरातील कोंढवा परिसर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरला आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढून 'मी पुन्हा येईन' असा संदेश ठेवून तीव्र मानसिक धक्का दिला आहे.

ही घटना पुण्यातील कोंढवा येथील एका गार्डेड सोसायटीमध्ये घडली आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून कोंढव्यातील गार्डेड सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सोसायटीमध्ये जाताच त्याने दरवाज्यावर पीडित महिलेला 'कुरिअर बॉय असल्याचे सांगितले. पण तिथे असणाऱ्या तरुणीने त्याने दिलेले कुरिअर हे तिचे नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र, कुरिअर बॉयने हे कुरिअर तुमचे असून तुम्हाला यावर सही करावी लागेल असा त्या तरुणीसमोर आग्रह धरला. 

नकार देऊन देखील कुरिअर बॉयने आग्रह केल्यामुळे अखेर त्या महिलेला सेफ्टी दरवाजा उघडून बाहेर यावे लागले. ज्यावेळी ती तरुणी बाहेर आली त्याच क्षणी  त्या आरोपीने त्या तरुणीच्या तोंडावर केमिकल असणारा स्प्रे फवारला. ज्यामुळे ती जागीच बेशुद्ध झाली. यानंतर कुरिअर बॉयने तिच्यावर बलात्कार केला.यानंतर आरोपीने अत्यंत निर्ढावलेपणाने पीडितेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला. तसेच 'मी पुन्हा येईन' असा मजकूर टाईप करून ठेवला. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५  वर्षीय महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाबा म्हणजे, या घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईल मध्ये सेल्फी काढला आणि परत येईल असे टाईप करुन ठेवले. बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःला डिलिव्हीरी  बॉय म्हणून भासवून सोसायटीत घुसला. तो पीडितेच्या घरी गेला आणि तिला कुरिअर घेण्यास सांगितले. त्यावेळी तीने माझे कुरिअर नाही असे पीडितेने सेफ्टी डोअरमधूनच सांगितले. त्यावेळ आरोपीने थेट तिच्या तोंडावर पेपर स्प्रे मारला. आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि त्याला मजा आली आणि तो परत येईल असा मेसेज लिहिला. या घटनेने शहरात खळबळ उडाली. ही महिला तिच्या भावासोबत राहते. कोंढवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. 


 Give Feedback



 जाहिराती