सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 DIGITAL PUNE NEWS

शालेय साहित्य वाटप उपक्रमाद्वारे ७४ गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले!

अजिंक्य स्वामी    07-07-2025 11:46:49

पुणे :  Keshu Foundation तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वारगेट येथील पंचशील बुद्ध विहार येथे पार पडलेल्या या उपक्रमात ७४ विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी आवश्यक असणारे वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल अशा संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे आर्थिक अडचणींमुळे शिक्षणासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देणे व त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणे.

 

 

लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने:

केवळ एक पालक असलेली मुले

अक्षम किंवा गंभीर आजारी पालक असलेली मुले

अत्यंत गरीब, सामाजिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थी

कार्यक्रमाला लाभले मान्यवरांचे मार्गदर्शन:

या सामाजिक उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा मोलाचा पाठिंबा लाभला. यामध्ये डॉ. चेतन कापडनीस (IQAC संचालक, विश्वकर्मा विद्यापीठ), शेखर पायगुडे, स्वीटी ठाक्कर, अंगद तौर (सर्वजण सहाय्यक प्राध्यापक, विश्वकर्मा विद्यापीठ), सीमा माणगांवकर (वरिष्ठ इंस्ट्रक्शनल डिझायनर), पूजा काळे आणि पूजा साकरकर यांचा समावेश होता.

संस्थेचे कार्य आणि उद्दिष्ट:

Keshu Foundation चा मुख्य उद्देश अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षण आणि डिजिटल साक्षरता या माध्यमातून सक्षम करणे हा आहे. त्यांच्या इतर उपक्रमांमध्ये सोशल मीडया, इव्हेंट मॅनेजमेंट, कंटेंट रायटिंग अशा क्षेत्रात प्रशिक्षण देणं, तसेच पारदर्शक पद्धतीने मदतीचा प्रसार करणे यांचा समावेश आहे.

संस्थेचे संस्थापक अंकुश बिरादार यांनी ४ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सामाजिक प्रवासाने आजवर ३२८० पेक्षा जास्त लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवली आहे. त्यांचं स्वप्न आहे की २०२७ पर्यंत ५००० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी.

संस्थेचे ब्रीद:

“एक वहीपासून सुरू झालेला प्रवास, आज ७४ हसऱ्या चेहऱ्यांपर्यंत!”

“ही मदत म्हणजे केवळ वह्या-पुस्तकांची नाही, तर आत्मविश्वास आणि आशेची नवी पालवी आहे.”Keshu Foundation च्या या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक आश्वासक पाऊल टाकले गेले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन शक्य आहे, हे या उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

अधिक माहितीकरिता संपर्क:

 अंकुश बिरादार - 9028726332


 Give Feedback



 जाहिराती