पुणे : कोथरुड मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत असून, कोथरुडमधील एरंडवणे येथून नदीपात्रातील रस्त्या मार्गे शहरात जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रजपूत वीटभट्टी परसरातील रस्ता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे सदर भागातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे.
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आग्रहाची भूमिका घेतली होती. मतदारसंघतील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत सातत्याने बैठका घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यामुळे गतीमान झालेल्या महापालिकेने मिसिंग लिंकमधील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. यामध्ये पहिल्या टप्प्यात रजपूत वीटभट्टी परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भागातील ८ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण होऊन रस्याचे रुंदीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.त्यामुळे ८ मीटरच्या रस्ता १२ मीटर झाला असून, सदर रस्ता वाहतुकीसाठी अतिशय प्रशस्त झाला आहे. त्यामुळे कोथरुडकरांची मोठी सोय झाली आहे.हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यामध्ये महापालिका प्रशासन, स्थानिक नागरिक, माजी नगरसेवक यांची मोलाची साथ मिळाल्याबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच, उर्वरित टप्प्यातील रस्त्याचे रूंदीकरण लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.