पुणे : आजवर अनेक वसतिगृहे तसेच अंगणवाड्या, विद्यापीठ यांच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते म्हणून आंदोलने झाली आहेत, अगदी बुलढाण्यात मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात जेवणातून विषबाधा झाली होती परंतु कुठेही या संजय गायकवाड आमदाराने कधी आवाज उठवल्याचे ऐकू आले नाही. या विद्यार्थ्यांनी अहिंसक मार्गाने निषेधाची आंदोलन केली. परंतु राज्याचा सत्ताधारी पक्षाचा आमदारच जर आमदार निवासात मारहाण करत असेल तर याला लोकप्रतिनिधी कसे म्हणावे? कॅन्टीन बाबत तक्रारीचे, कारवाईचे इतर अनेक पर्याय समोर असताना शारीरिक मारहाण, दमदाटी करणे हा आमदाराचा हक्क आहे असेच घटनेनंतरच्या प्रतिक्रियेवरून दिसत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी.
- मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी