पुणे : पुणेकरांनी आपले प्रतिनिधी म्हणून मुरलीधर मोहोळ यांना राजधानी दिल्लीत पाठवून एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहिल्याचवेळी त्यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रायलाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. मंत्री म्हणून काम करतानाही खासदार मोहोळ यांनी विधानसभानिहाय जनता दरबाराव्दारे पुणेकरांशी संवाद ठेवला. पुणेकरांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्याशी कायम संवाद राखण्यासाठी आता शहराच्या मध्यवर्ती भागात २४ तास खुले असणारे खासदार जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे. जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या या कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी ( दि.१२) होणार आहे.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन होणार आहे. जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण दुपारी ३ः३० वाजता तर अहवाल प्रकाशन कार्यक्रम दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. पुणेकरांच्या समस्या, अडी-अडचणी राज्यमंत्री मोहोळ यांच्यापर्यंत पोचाव्यात या हेतूने हे कार्यालय २४ तास खुले असणारे आहे. पुणेकरांच्या आणि नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेच्या योजनांची महिती मिळेल आणि लाभ घेण्यासाठीचीही प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या विविध लागणारे विविध प्रकारचे दाखले आणि ओळखपत्र मिळवण्याची सुविधा, या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याचा महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुण्यासाठीच्या दीर्घकालीन हिताच्या योजनांची आखणी व पायाभरणी केली. त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारने अभूतपूर्व मदत केली. आता मंत्रिपदामुळे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करण्यासाठी योगदान देता येत आहेत. या बरोबरच विकसित पुण्याच्या दिशेनेही ठोस पावले टाकायला सुरूवात केली आहे. या सर्व वाटचालीत पुणेकरांची भक्कम साथ आवश्यक आहे. त्यासाठीच जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे’.