सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 शहर

पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेच्या बनमस्कामध्ये सापडली काच; खवय्यांमध्ये संतापाची लाट

डिजिटल पुणे    11-07-2025 10:56:32

पुणे : पुणे शहर हे येथील वातावरण, टेकड्या, आयटी पार्ट आणि नामांकित शिक्षण संस्थासाठी प्रसिध्द आहे. पण त्याच बरोबर पुण्याची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे येथील खाद्यपदार्थ संस्कृती. पुण्यात असे काही प्रसिद्ध फुड आऊटलेट आहेत जे त्यांच्या खाद्यपदार्थांची वर्षानुवर्षे तीच चव जपत आहेत. दरम्यान, पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध गुडलक कॅफेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुडलकच्या बनमस्क्यात काच आढळली आहे. त्यामुळे खवय्येंना मोठा धक्का बसला आहे. 

गुडलक कॅफे हे पुण्यातील प्रसिद्ध कॅफेंपैकी एक आहे. या कॅफेत तरुणवर्गाचा रेलचेल सुरु असते. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने गुडलक कॅफेमध्ये येत असतात. विशेष म्हणजे येथील बनमस्का खुप प्रसिद्ध आहे. आणि त्याच पदार्थामध्ये काच आढळल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

काही दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. गुडलक कॅफेचा अर्धा भाग अनधिकृत असल्याने महापालिकेने हातोडा चालवला. गुडलक कॅफेला अर्धा भाग तोडण्यात आला होता. गुडलक कॅफेचा बाहेरील भाग, जिथं टेबल लावण्यात आली आहेत, तसंच पत्रे लावलेली रचना अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती