पुणे : पुणे आंबेगाव खुर्द या ठिकाणी नागरिक ड्रेनेज च्या पाण्याने नागरिक भयंकर ग्रासले असून नागरिकांच्या समस्येकडे प्रशासन वारंवार कानाडोळा करते आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील याकडे प्रशासकीय अधिकारी खासदार, आमदार, माजी नगरसेवक यांचे दुर्लक्ष होताना दिसते.
नागरिकांच्या समस्या वारंवार सांगून देखील या ठिकाणी कुठलीही उपाययोजना होताना दिसत नाही. 250 कोटी रुपयाचे ड्रेनेज विभागामफत टेंडर दिले असून देखील नेमके हे पैसे कोणाच्या खिशात गेले, नागरिकांना हे काही समजेनासे झाले आहे. 2017 समाविष्ट हे गाव पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये करण्यात आले. आतापर्यंत हजारो कोटी रुपये या भागामध्ये खर्च केले असून देखील नेमका विकास गेला कुणीकडे असंच म्हणावं लागेल स्मार्ट सिटी च्या नावाखाली मोठा या भागातून टॅक्स गोळा केला जातो. परंतु नागरिकांना सुविधा या मिळताना दिसत नाही.
सच्चाई माता परिसर अटल 1 ते 12 या भागामध्ये ड्रेनेज लाईन पावसाळी लाईन या अस्तित्वातच नाही. त्या नसल्यामुळे ड्रेनेच पाणी नागरिकांच्या घराच्या समोर घरामध्ये साठात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पांढऱ्या मोठ्या आळ्या, मच्छरचे मोठं साम्राज्य पसरले असून या ठिकाणी पालिकेचे काम करण्यास कर्मचारी कानाडोळा करतात. स्थानिक नागरिकांना लहान मुले, वयोवृद्ध यांना ड्रेनेजच्या पाण्यामुळे ताप, मलेरिया, अंगदुखी, डेंगू, अशा विविध आजाराने ग्रासले आहेत. या ठिकाणी कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असून अनेकांना दुसरीकडे राहण्यास भाडे परवडत नसल्यामुळे अशा घाणेरड्या परिस्थितीमध्ये नागरिक राहत आहे.
अनेक स्थानिक लोक घरे सोडून गेले असून त्या ठिकाणी मोठी गुन्हेगारी हे देखील वाढत आहे. आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय हे प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करत आहे. 8 दिवसांमध्ये काम चालू नाही झाल्यास अमरण उपोषण सुरु करणार असे पत्र जगदीश खानोरे मुख्य कार्यकारी अभियंता मल: निसारण विभाग यांची भेटून उपोषणाचा इशारा देण्यात आला. असे वक्तव्य प्रशांत कांबळे यांनी केले आहे.
