सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार; नुकतेच झाले होते उद्घाटन

डिजिटल पुणे    11-07-2025 12:57:43

टोरांटो – प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडामधील नव्याने सुरु झालेल्या कॅफेवर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चथरथ यांनी संयुक्तपणे हा व्यवसाय सुरु केला होता. पण आता त्या कॅफेवर अचानक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

सदर प्रकार कॅनडामध्ये घडला असून, अज्ञात व्यक्तींनी कॅफेजवळ येऊन थेट गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

कपिल शर्माने अलीकडेच व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत गिन्नीच्या सोबतीने कॅनडामध्ये एक कॅफे सुरु केला होता. काही दिवसांपूर्वीच या कॅफेचे भव्य उद्घाटन पार पडले होते. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर इतक्या लवकर या ठिकाणी असा प्रकार घडल्याने चाहते आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी अद्याप कपिल शर्माकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. स्थानिक पोलीस तपास करत असून, गोळीबारामागचे नेमके कारण काय, हे अजून स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यामुळे कॅनडामधील भारतीय समुदायातही चिंता व्यक्त केली जात असून, सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती