उरण : उरण शहरात तसेच उरण मधील ग्रामीण भागात वारंवार जाणारी वीज, तुटलेले व मोडकळीस आलेले खांबे,लोंबकळत असलेल्या तारा, अनेक ठिकाणी नवीन खांबे बसविणे, स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती, विविध गावांमध्ये विजेचा प्रवाह कमी दाबाने व सुरळीत वीज प्रवाह न होणे,कर्मचाऱ्यांची आरेरावी,कर्मचाऱ्यांमार्फत कामे वेळेत न होणे, कामे व्यवस्थित न होणे, ग्राहकांच्या घरी ग्राहकांची परवानगी न घेता अडाणीचे वीज मीटर बसविणे,दोन तीन वर्षाची एकदाच पेनल्टी घेणे,ग्राहकांना भरमसाट बिले देणे, ग्राहकांना विना कारण धमकीविण्याचे प्रकार,कामावर कर्मचाऱ्यांची कमतरता, अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे नागरिकांच्या समस्याकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष, पत्रव्यवहार करूनही समस्या न सुटणे, ग्राहकांनी वीज वितरण कार्यालयात फोन केला तरी कर्मचाऱ्यांनी फोन न उचलणे.
ग्राहकाने सांगितलेला व केलेल्या पत्रव्यवहाराला वेळेत प्रतिसाद न देणे, विजेच्या तारा न बदलणे,वारंवार वीज जात असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना न करणे,अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा, महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे ढिसाळ व बेजबाबदार कारभाराचा निषेध करण्यासाठी व जनतेच्या गोरगरिबांच्या समस्या त्वरित सुटाव्यात तसेच ३०० युनिट पर्यंत सर्वांना बिल माफ करण्यात यावे या सह इतर मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालय कोटनाका येथे अधिकाऱ्यांना घेराव घालत विविध समस्या बाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थिती खाली महावितरण कार्यलयाला भेट देण्यात आली. यावेळी रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,तालुका संपर्क प्रमुख दिपक भोईर,तालुका प्रमुख संतोष ठाकूर,सरपंच भास्कर मोकल, तालुका संघटक बी एन डाकी, गटनेते गणेश शिंदे,भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील,उप तालुका संघटक के एम घरत,युवा नेते रुपेश पाटील,नागाव ग्रामपंचायत सरपंच चेतन गायकवाड,कोप्रोली शाखा प्रमुख रवि म्हात्रे,उप तालुका संघटिका सुजाता पाटील,माजी तालुका प्रमुख रंजना तांडेल,शहर संघटक महेश वर्तक,शहर माजी संघटक प्रवीण मुकादम,शहर संघटक वीणा तलरेजा, मेघा मस्त्री,आवरे ग्रामपंचायत सदस्य सोनाली म्हात्रे,कळंबूसरे सरपंच उर्मिला नाईक,गोवठने सरपंच प्रणिता म्हात्रे, वशेणी ग्रामपंचायत सरपंच अनामिका म्हात्रे,ऍड. मच्छिन्द्र घरत,योगिता पाटील आवरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, बी एन डाकी, भास्कर मोकल, रोहिदास पाटील आदींनी व उपस्थित सरपंच, उपसरपंच यांनी विविध समस्या मांडत अधिकाऱ्यांना समस्या का सुटत नाही याविषयी जाब विचारला.
वीज समस्या बाबत शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्या. जनतेला, ग्राहकांना कसा नाहक त्रास होतो याचा पाढाच शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानीं यावेळी वाचला. यावेळी महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास विष्णू गायकवाड यांना उरण शहर व उरण ग्रामीण भागातील समस्या का सुटत नाही याबाबत जाब विचारण्यात आला. यावर माहिती देताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास विष्णू गायकवाड यांनी सांगितले की माझी नुकतीच पंधरा दिवस अगोदर उरण महावितरण कंपनी येथे नियुक्ती झाली आहे. मी येथे नवीन आहे.मी समस्या समजून घेतो व त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो.
अगोदरची रखडलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील.प्रत्येक ग्रामपंचायतला तसेच सरपंच यांना भेट देऊन त्या त्या गावातील समस्या प्राधान्याने सोडवविण्यात येतील. ग्राहकांना जनतेला त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ तसेच आम्हाला काही वेळ द्या. ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला दिले आहे.सर्व समस्या सोडविण्यासाठी २० दिवसांचा अवधी देण्याची विनंती अभियंता विकास गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाकडे केली आहे. यावर शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने महावीतरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना २० दिवसाची मुदत दिली आहे. ३० जुलै पर्यंत सर्व कामे करण्यासाठी महावितरण वीज कंपनीला मुदत देण्यात आली आहे.मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने माजी आमदार मनोहरशेठ भोईर,उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,तालुका प्रमुख संतोष ठाकूर, बी एन डाकी, भास्कर मोकल, रोहिदास पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महावितरण वीज कंपनीला दिला आहे.