सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • नांदेड जिल्ह्यात पावसाने उडवली दानादान; नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस.
  • परभणीच्या पालम तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली; 9 गावांचा संपर्क तुटला
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 जिल्हा

धापेवाडा येथील वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सांत्वन

डिजिटल पुणे    29-08-2025 14:07:26

नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बु. येथील शेतामध्ये वीज पडून २७ ऑगस्ट रोजी वंदनाताई प्रकाश पाटील व त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील तसेच शेतात काम करणाऱ्या मदतनीस निर्मलाताई रामचंद्र पराते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील व पराते कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेतील मृतांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शासनाच्या निकषानुसार मृत पाटील व पराते कुटुंबियांना आर्थिक मदतीचा मदतीसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लाभ देण्यात आले. यावेळी आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आदी उपस्थित होते.

घडलेली घटना दुर्देवी असून कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे,  काळाचा मोठा घाला कुटुंबियांवर झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 24 तासांच्या आत कुटुंबातील व्यक्तीला मदत देण्यात आली आहे. पराते कुटुंबियांच्या खात्यावर तत्काळ निधी जमा करण्यात आला असून पाटील कुटुंबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी म्हटले.


 Give Feedback



 जाहिराती