सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • नांदेड जिल्ह्यात पावसाने उडवली दानादान; नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस.
  • परभणीच्या पालम तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली; 9 गावांचा संपर्क तुटला
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 व्यक्ती विशेष

मराठा समाजाबाबत आम्ही सकारात्मक, ओबीसी व मराठा समाजात भांडण लावू नका, चर्चेतून मार्ग काढू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

डिजिटल पुणे    29-08-2025 18:29:04

मुंबई : मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. "गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण व न्याय दिला. आधीच्या कोणत्याही सरकारने काही केले नाही," असे ते म्हणाले. ठाकरे-पवार समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. "ओबीसी व मराठा समाजात भांडण लावू नका, चर्चेतून मार्ग काढू," असे फडणवीसांनी स्पष्ट केले. काही पक्ष राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ठाम भूमिका घेत नाहीत, असेही ते म्हणाले

मनोज जरांगे पाटील यांना एकच दिवसाची उपोषणाची परवानगी दिली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हा माझा शब्द आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कोर्टाने परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी 20 अटी घालून या उपोषणाला परवानगी दिली आहे. मात्र, आजसाठीच ही परवानगी असणार आहे. 

मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करत आहेत. आंदोलनासाठी त्यांना देण्यात आलेल्या 8 तासांच्या मुदतीचा आता शेवटचा अवघा 1 तास शिल्लक आहे. सकाळी 10 वाजता जरांगेंनी आंदोलन सुरु केलं. 8 तासांच्या मुदतीनुसार त्यांच्या आंदोलनाची वेळ संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. मराठा आंदोलनासाठी वेळ वाढवून देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. परवानगीबाबत पोलिस विचार करतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

लोकशाही पद्धतीने आदंलोन सुरु असले तर सहकार्य केले जाईल.  इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आहेत. काही लोकचं जरा वेगळ्या पद्धतीने वागतात. यामुळे आंदोलनाला गालबोट लागतेय आंदोलकांना कोणत्याही प्रकारचे आढमुठ पणाने वागू नये. न्यायालयाच्या आदेशनुसार सर्व कायद्याच्या चौकटीत राहून  सरकार आंदोलकांच्या मागण्या मान्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संविधानात राहिल अशा प्रकारे कायदेशीर मार्ग काढावा लागेल. OBC आणि मराठा समाज यांच्यात वाद निर्माण होणार नाही अशा प्रकारे हा प्रश्न हाताळला पाहिजे. मराठा आणि OBC या दोन समाजांना भडकवून या दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. अनेक जण अशा प्रकारची व्यक्तव्य करत आहेत. आम्ही मराठा समजाबाबत सकारात्मक आहोत. आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे.  0चर्चेतून मार्ग  निघू शकतो. मराठ्यांना 10 टक्के आरक्षण लागू झाले आहे. त्यापद्धतीने भरती देखील सुरु आहे. मराठा मराजाचे आरक्षण टिकलेले देखील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

 

 


 Give Feedback



 जाहिराती