सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ओबीसींसाठीही उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य
  • मोठी बातमी! ओबीसीसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; शासनाकडून आजच GR निघणार
  • : खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
  • पुण्यातील मुळशी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा बुडून मृत्यू
  • जीआरमध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरु देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा
 व्यक्ती विशेष

मुंबई जाम करणे अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही…”; छगन भुजबळांचा थेट इशारा

डिजिटल पुणे    02-09-2025 15:37:44

मुंबई : मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाचा 5 वा दिवस असून, मराठा समाजाने OBC तून आरक्षण मिळावे अशी मागणी करत आहे. परंतु, OBC नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एकवटले असून त्यांनी इशारा दिला की, मराठा आरक्षण OBC मध्ये दिले गेले तर आम्हीही मुंबई जाम करू शकतो. भुजबळ म्हणाले, मराठा समाज आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागास नाही; कुणबी व मराठा वेगळे असून OBC आरक्षण देणे शक्य नाही. सरकारने EWS आरक्षणाद्वारे 10% जागा दिल्या आहेत, ज्यात मराठा समाजाचा समावेश आहे.

ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हैदराबाद गॅझेटचा आधार ते घेत आहेत, परंतु त्यात देखील मराठा आणि कुणबी वेगळे दाखवले आहेत. त्यावेळी, 1921 साली 2 लाख मराठा तिथ होते, तर 33 हजार कुणबी होते. देवेंद्र फडणवीस असोत की शरद पवार 50 टक्क्याच्या आत कोणीही आरक्षण देऊ शकत नाही. मराठा समाज आर्थिक, सामाजिक मागास नाही, तरीदेखील आरक्षणाची मागणी करत आहे. ईडब्ल्यूएस, एसईबीसी तसेच ओपन आणि ओबीसी अशा चार आरक्षणाचा फायदा घेत आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.  

आम्हाला मुंबई जाम करणे अवघड नाही

मुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मी कुणबी आणि मराठा वेगळे असल्याचे दाखले दिले आहेत. मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, जर तुम्ही निर्णय घेतला तर आम्हाला देखील मुंबईला यावं लागेल, असे म्हणत छगन भुजबळ यांनीही ओबीसी आंदोलकांच्यावतीने मुंबई जाम करण्याचा इशारा दिलाय. उद्यापासून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको ही भूमिका घेऊन राज्यभर आंदोलने केली जातील आणि निवेदन देखील दिल जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटलं. 


 Give Feedback



 जाहिराती