सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ओबीसींसाठीही उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य
  • मोठी बातमी! ओबीसीसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत होणार; शासनाकडून आजच GR निघणार
  • : खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू
  • पुण्यातील मुळशी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा बुडून मृत्यू
  • जीआरमध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरु देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा
 जिल्हा

पालकमंत्री नितेश राणे यांची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतली भेट

डिजिटल पुणे    02-09-2025 16:40:03

सिंधुदुर्गनगरी : नुकत्याच नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची औपचारिक भेट घेतली. या भेटीच्या वेळी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, चालू प्रकल्प, जनतेच्या सुविधा तसेच आगामी विकास आराखड्यांवर चर्चा झाली.

पालकमंत्री राणे यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेणे हे आपले ध्येय असावे, असे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा उभारणी, पर्यटन विकास, शिक्षणक्षेत्रातील सुधारणा तसेच रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती