पुणे : अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांच्या सायबर वॉरियर्स टीम तर्फे विजय तरुण मंडळ, माळवाडी राजधानी येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. हा उपक्रम अध्यक्ष माऊली तानाजी गायकवाड, उपाध्यक्ष निखिल सीताराम गायकवाड, खजिनदार तेजस गायकवाड व प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवडी माळवाडी येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सायबर वॉरियर्स अंकिता हरपळे व समिक्षा गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांना ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे मार्ग, सोशल मीडियावरील सुरक्षितता, डेटा प्रायव्हसीचे महत्त्व तसेच मोबाईलमध्ये Anti-Fraud Application इन्स्टॉल करण्याचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, तरुणाई यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कॉलेज आणि प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे सर यांच्या कार्याचे जमलेल्या नागरिकांनी विशेष कौतुक केले. विजय तरुण मंडळ, अण्णासाहेब मगर महाविद्यालय व Quick Heal फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समाजात सायबर सुरक्षेबाबत जागरूकतेचा नवा संदेश पसरला.