सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्याची मिरवणूक सुरू! मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...
  • वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी
  • पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर , शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत
  • मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही; संजय राऊतांचा घणाघात
 जिल्हा

शिवसेना उरण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उरणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    04-09-2025 10:42:19

उरण : शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उरण तर्फे दरवर्षी बाझारपेठ गणपती चौकात गणेशोत्सव साजरा होता. दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम गणेशोत्सव काळात राबविले जातात यंदाही शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उरण यांच्या वतीने बुधवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण शहर शाखेजवळ अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई व जयश्री फाउंडेशन यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीराचे  आयोजन करण्यात आले होते, या शिबिरामध्ये बी.पी चेक, शुगर चेक , वजन चेक, रक्तदाब तपासणी, शरीर द्रव्य निर्देशांक (BMI), हाड घनता तपासणी, तसेच सर्व रुग्णांना शिबिरात तज्ञ् डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला.

या शिबिरामध्ये १३०  नागरिकांनी लाभ घेतला.या शिबिराचा आयोजन केल्याबद्दल नागरिकांनी, भाविक भक्तांनी श्री गणेशोत्सव मंडळाचे व शिवसेनेचे आभार मानले आहेत.  या या शिबिरास शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख  नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, शहर संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, माजी शहर संघटक प्रवीण मुकादम, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिवा म्हात्रे व कार्यकर्ते उपस्थित होते, सदर आरोग्य शिबिराच्या आयोजन शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदेश पाटील, सुशांत तांडेल, संजय मेश्राम, फतेह खान, रोनित पाटील, यश मढवी व कार्यकर्ते यांनी केले होते.


 Give Feedback



 जाहिराती