सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्याची मिरवणूक सुरू! मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...
  • वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी
  • पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर , शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत
  • मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही; संजय राऊतांचा घणाघात
 जिल्हा

नागपूरमधील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू; तर 17जण जखमी

डिजिटल पुणे    04-09-2025 12:33:49

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल (3 सप्टेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोट झाला. या स्फोटात 1 कामगाराचा मृत्यू झाला, तर, 17 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आज सकाळपासून कंपनीच्या समोर बघ्यांची गर्दी वाढलीय. सकाळ पाळीतील कर्मचाऱ्यांनाही आत घेण्यात आलेले नाही.

काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास  बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ज्यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून १७  कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आहे. त्यांपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकं गाढ झोपेत असताना कंपनीत झालेला हा मोठा स्फोट भयावह होता. ज्यामुळे परिसरात काही काल खळबळ माजली होती. 

हा स्फोट नेमका कसा झाला? 

नागपूर येथील सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीमधील रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाला. तत्पूर्वी सीबी वन या प्लांटमध्ये काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अगतिक घडेल याचा अंदाज पूर्वीच आला होता. त्यामुळे सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली. मात्र संबंधित प्लांटमधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाहीत, आणि तेवढ्यात स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडाले आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले.

सदर घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दलासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कूलिंग ऑपरेशन करून मालब्याखाली दबलेल्या जखमींना रात्रीच बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले.पोलीस, अग्निशमन दलासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रात्री उशिराच घटनास्थळी दाखल झाले होते. सुरुवातीला घटनास्थळी काही वेळ पुन्हा स्फोट घडणार नाही, याची काळजी म्हणून वाट पाहण्यात आली, त्यानंतर कूलिंग ऑपरेशन करून मालब्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना प्रथमोपचारानंतर नागपूरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळपासून सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या समोर बघ्यांची गर्दी वाढली असून सकाळ पाळीतील कर्मचाऱ्यांना ही आत घेण्यात आलेले नाही.


 Give Feedback



 जाहिराती