सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्याची मिरवणूक सुरू! मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...
  • वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी
  • पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर , शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत
  • मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही; संजय राऊतांचा घणाघात
 विश्लेषण

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर वाहतुकीत 'हे' मोठे बदल

डिजिटल पुणे    05-09-2025 15:40:13

पुणे : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. तर 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासह शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन असणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आठ हजार पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये,यासाठी शहर पोलिस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी विसर्जन मिरवणूक परवा दिवशी दुपारपर्यंत सुरू राहील. या कालावधीत सुमारे आठ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी,अंमलदार आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात असतील. मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे

शहरात दोन दिवस जड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून पुणे पोलिसांनी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.मिरवणुकीतील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रमुख मार्गांवरील चौकांमध्ये पोलिस मदत केंद्र असतील. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथके असतील. सोनसाखळी व मोबाईल चोरीचे प्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. तसेच, सर्व लॉजेस, हॉटेलची तपासणी करून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे.

मिरवणुकीत विद्युत रोषणाईची मंडळे सायंकाळी सात वाजल्यानंतर सहभागी होतील. यावेळी लक्ष्मी रोड व शिवाजी रोडवरून येणाऱ्या मंडळांना फक्त बेलबाग चौकातूनच प्रवेश दिला जाईल. विशेष म्हणजे कसबा गणपती अलका टॉकीज चौक पार करेपर्यंत कोणतेही इतर मंडळ त्या चौकात प्रवेश करणार नाही. यामुळे मिरवणूक शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.पोलिसांनी काही अटीसुद्धा घालून दिल्या आहेत. टिळक पुतळा ते बेलबाग चौक या दरम्यान वाद्यवृंद वादनास मनाई असून वादनाची सुरुवात बेलबाग चौकातूनच करता येईल. तसेच दोन मंडळांमध्ये अंतर न ठेवणे, कोणीही रांग सोडून प्रवेश न करणे, स्थिर वादन न करणे अशा सूचनादेखील दिल्या आहेत. प्रत्येक मंडळास दोनच ढोल-ताशा पथकांची परवानगी असून एका पथकात जास्तीत जास्त 60 सदस्य राहतील.

याशिवाय डीजे किंवा ढोल-ताशा पथक यापैकी फक्त एकाच गोष्टीचा वापर प्रत्येक मंडळ करू शकेल. ढोल-ताशा पथक सदस्यांनी मिरवणूक संपल्यानंतर परतीचा मार्ग उलट दिशेने घेऊ नये, असेही आदेश दिले आहेत.

पुणे शहरातील मुख्य १७ रस्ते वाहतूकीसाठी असणार बंद 

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी तगड नियोजन केलं आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रॅफिकसह पार्किंगसाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून वाहतूक नियमांसाठीचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतूकीसाठी बंद असणार आहेत. तर 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येणार आहे. यासह शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन निर्माण करण्यात आले आहे. तर शहरात दोन दिवस जड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी असणार आहे. शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून पुणे पोलिसांनी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. 

वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते

शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड ,केळकर रोड, टिळक रोड, जंगली महाराज  रस्ता, कर्वे रोड,FC रोड, भांडारकर रस्ता पुणे सातारा रोड, प्रभात रोड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती