सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पुण्याची मिरवणूक सुरू! मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...
  • वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी
  • पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर , शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत
  • मिस्टर अजित पवार कुठे गेली तुमची शिस्त? तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही; संजय राऊतांचा घणाघात
 शहर

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड दौरा अचानक रद्द;कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली

डिजिटल पुणे    05-09-2025 18:29:47

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड दौरा अचानक रद्द झाला आहे. आज ते शहरातील ३५ हून अधिक गणपती मंडळांना भेट देऊन आरती करणार होते. मात्र, काही कारणास्तव हा दौरा रद्द करून ते थेट मुंबईला रवाना झाले. दुपारी साडेबारा ते रात्री दहा वाजेपर्यंत हा दौरा नियोजित होता. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन हा दौरा आयोजित करण्यात आला होता, मात्र दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा आज (शुक्रवार) पिंपरी-चिंचवड शहरातील नियोजित दौरा अनपेक्षितपणे रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यात ते शहरातील अनेक गणेश मंडळांना भेट देऊन दर्शन घेणार होते. मात्र, ठरलेल्या वेळेआधीच म्हणजे दुपारी सव्वा दोनच्या सुमारास, ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले, यामुळे अनेकांची निराशा झाली. शहरातील सुमारे चाळीस गणेश मंडळांना अजित पवार भेट देणार असल्याने, मंडळांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. स्वागतासाठी रंगीबेरंगी फलक, मंडप सजावट, विशेष प्रकाशयोजना आणि कार्यकर्त्यांची गर्दी सगळेच काही जोमात सुरू होते. पण दौरा रद्द झाल्याने हा उत्साह काहीसा मावळल्याचं चित्र दिसून आलं.

अजित पवारांचा दौरा नेमका का रद्द करण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. नियोजनाप्रमाणे ते दुपारी १२:३० वाजता शहरात दाखल होणार होते, परंतु पावणे दोनच्या सुमारास त्यांनी अचानक मुंबईकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल यांनी माहिती देताना सांगितले, “अजितदादांचा दौरा काही तातडीच्या कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. ते सध्या मुंबईकडे निघाले असून, शहरातील मंडळांना भेट देण्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.”

दोन दिवसांपासून मंडळांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू होती. अनेकांनी याला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय ताकद दाखवण्याची संधी म्हणून पाहिलं होतं. मात्र दौरा रद्द झाल्यामुळे संपूर्ण नियोजनच अंगलट आलं आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक गणेश मंडळांमध्ये निराशा पसरली आहे. “इतक्या दिवसांपासून तयारी करत होतो, पण शेवटच्या क्षणी दौरा रद्द झाला, त्यामुळे खूप वाईट वाटतंय,” अशी भावना अनेक मंडळांतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


 Give Feedback



 जाहिराती