पुणे : पुणे पोलिसांनी आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे. मास्टरमाईंड अजूनही फरार असून सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल आयुष कोमकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे सगळे आरौपी फरार झाले होते त्यातील सहा जणांना मध्यरात्री पोलिसांनी राज्य बाहेरून अटक केली आहे. बंडू आंदेकर स्वराज वाडेकर तुषार वाडेकर वाडेकर आई आणि आणखी दोघांना अटक करण्यात आलीय इतर आरौपीचा शोध सुरु आहे.
आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी १९ वर्षांच्या आयुष कोमकरवरती तब्बल ११ गोळ्या झाडल्या. यातील ९ नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात आढळल्या आहेत. हल्लेखोरांनी बेसमेंटमध्ये दबा धरून आयुषची हत्या केली. या हत्येनंतर आयुषची आई कल्याणी कोमकरने आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. पण हा गुन्हा दाखल व्हायच्या आधीच आंदेकर कुटुंब फरार झालं. एकीकडे गणेश उत्सव आणि दुसरीकडे पुण्यात झालेली ही हत्या, यामुळे आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. आता अखेर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे.
आयुष खून प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा देखील समावेश आहे. आयुषची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांना अटक केली होती. यात प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी असलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा देखील समावेश होता. आता या प्रकरणात आणखी सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी मध्यरात्री उशिरा कारवाई करत सहा जणांना अटक केल्याची माहिती आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये नक्की कोण आहेत? याबाबतचा तपशील किंवा त्यांची नावं समोर आलेली नाहीत. मात्र पहाटे पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.यापूर्वी यश पाटील आणि अमित पोटोळे असं दोघांना अटक केली होती. आता अटकेतील आरोपींचा आकडा आठवर पोहोचला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्राबाहेरून बंडू आंदेकर याच्यासह स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, त्यांची आई आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
आयुष कोमकर याच्यावर काल (सोमवारी) मोठ्या पोलिस बंदोबस्तात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपींना राज्याबाहेरून अटक केली आहे. या प्रकरणात आधी गुन्हा दाखल होता, त्यामधील सहा आरोपांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वाडेकर आई यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र पोलिसांना सहा जणांना अटक केली. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.