बीड : बीड येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. नर्तिकीच्या नादात माजी उपसपंचाने गोळ्या झाडून स्वतःचे आयुष्य संपल्याची घटना घडली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे असे या माजी उपसरपंचाचे नाव आहे.बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसल गावच्या 38 वर्षीय माजी उपसरपंचाचा नर्तिकेच्या घराजवळ गाडीत मृतदेह आढळला. उपसरपंचाने स्वतःच्या कानशिलात गोळी चालवून आत्महत्या केल्याचा संशय आहे.
ग्राम पोलिस पाटील यांनी सकाळी सुमारास वरा पोलिसांना माहिती दिली की, गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक लाल रंगाची कार बराच वेळ बंद अवस्थेत उभी आहे. कार पूर्णपणे लॉक असून, आत एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत आहे. कारच्या बाजूलाच पिस्तूल पडलेले असल्याचेही निदर्शनास आले.त्यानंतर पोलिस निरीक्षक गावडे, एपीआय जगदाळे यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख गोविंद जगन्नाथ बरगे (रा. मसला, ता. गेवराई, जि. बीड) अशी पटली.चौकशीत समोर आले की, गोविंद बरगे आणि प्रशांत गायकवाड यांची बहीण पूजा यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता.
माजी उपसरपंचाची स्वतःवर गोळ्या झाडून हत्या
नातेवाईकांकडून डुप्लिकेट चावी मागवून कार उघडण्यात आली.आत गोविंद बरगे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत होता. त्याच्या डोळ्या कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या.गोळ्या आरपार गेल्याने अगदी जवळून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला.
या प्रकरणाचा तपास एपीआय जगदाळे करीत आहेत. पिस्तुलावरील परवाना आहे की नाही, याची तपासणी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांची व गायकवाड कुटुंबीयांची चौकशी केली आहे. प्रेमसंबंध तुटल्याने वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
नर्तिकेसोबत प्रेमसंबंध
दीड दोन वर्षापूर्वी थापडीतांडा येथील कलाकेंद्रात गोविंद गेले होते. तेव्हा त्यांची ओळख पूजा हिच्यासोबत झाली होती. ते तिला भेटायला नियमितपणे कलाकेंद्रावर जात होते.गोविंद यांच्या मेव्हण्याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार, गेवराईचा बंगाल माझ्या नावावर करा आणि पाच एकर जमीन भावाच्या नावावर करा, असा आग्रह पूजा हिने गोविंद यांच्याकडे धरला होता. तसेच मागणी मान्य न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ते गोविंद प्रचंड तणावात होते.
दरम्यान, काही दिवसांपासून पूजा या गोविंद यांच्यासोबत बोलत नव्हत्या. त्यामुळे गोविंद हे पूजाच्या बार्शी तालुक्यातील सासुर या गावी गेले होते. तेथे दोघांमध्ये नेमके काय वाद झाला किंवा काय चर्चा झाली याची माहिती नाही. मात्र, पूजा हिच्या घरापासून काही अंतरावर लाॅक केलेल्या गाडीमध्ये गोविंद यांचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर आढळला.त्यांच्या डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी लागली होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी पोलिस घातपात झाला आहे का? याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.