बीड : बीड मधून धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या इमामपूर रोड परिसरात तीन वर्षीय चिमुकलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. धक्कदायक म्हणजे याच भागात दोन दिवसांपूर्वीच तिचे वडिल जयराम बोराडे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. गेल्या दोन दिवसांपासून नातेवाईक आणि स्थानिक ग्रामस्थ तिला शोधत होते. आज सकाळी एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.
आज सकाळी बीड तालुक्यातील रामगड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या दुहेरी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी जयराम बोराडे या व्यक्तीने इमामपूर रोड परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता होती. तिचा दोन दिवसांपासून शोध सुरू होता. आज सकाळी याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत चिमूरडीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकले नसून ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान या घटनेचा तपास पोलिस करत आहेत, तर दोघांचा मृतदेह अशा अवस्थेत आढळून आल्याने हे कोडं सोडवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
गेल्या काही दिवसात बीडमधून अशा अनेक घटना समोर येत आहेत. अशीच घटना आज सकाळी देखील पाहायला मिळाली. तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह गळफास दिलेल्या अवस्थेत झाडाला लटकलेला दिसून आला. दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. ही घटना नेमकी कोणत्या कारणाने घडली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, दोन दिवसांपूर्वी या चिमुकलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, आणि आज ही चिमुकली देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. आता पोलिसांसमोर हे कोड सोडवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यांनी का नेमकी आत्महत्या केली आणि चिमुरडीला का गळफास दिला? हे पोलीस तपासामध्ये लवकरच समजेल. मात्र ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. दोघे घरातून बाहेर पडलेले होते. घरचे यांचा शोध घेत होते, दोन दिवसांपूर्वी वडील आणि आज चिमुरडी अशा अवस्थेत आढळून आल्याने बीड हादरलं आहे.