पुणे : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रोडवर मधोमध असलेले पावसाळी चेंबर वारंवार तुटत असल्यामुळे नागरिकांच्या जीवाशी पुणे महानगरपालिका थेट खेळ करत आहे. केवळ एका महिन्यात तीन वेळा चेंबर बसवावे लागते, यावरून पालिका व ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराचे आणि निकृष्ट कामाचे थरारक वास्तव उघड झाले आहे.
लाखो रुपयांचा पगार घेणारे पालिकेतील अभियंते आणि ठेकेदार नागरिकांच्या सुरक्षिततेशी सरळसरळ गद्दारी करत आहेत. नागरिकांचे जीव धोक्यात घालून, त्यांच्या पैशांचा अपव्यय करून, पुणे महानगरपालिका भ्रष्टाचाराचे अड्डे चालवत आहे, हे स्पष्ट दिसते.
महापालिका उपाययोजना करण्याऐवजी गप्प बसून या गैरव्यवहाराला अभय देत आहे. नागरिकांचा विश्वासघात करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली नाही, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल.
आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने स्पष्ट इशारा दिला जातो की नागरिकांच्या पैशाची लूट आणि जीवाशी खेळ त्वरित थांबवावा.ठेकेदार व संबंधित अभियंत्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत.अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन पालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन उभारले जाईल.आम आदमी पार्टी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शेवटपर्यंत लढणार आहे.