पुणे : बदल हा सृष्टीचा नियम असून स्वतःचा पर्यायाने राष्ट्राचा विकास साधण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रामध्ये काळानुसार होणारे बदल विद्यार्थ्यांनी स्वीकारणे आवश्यक आहे. शिक्षणातून फक्त साक्षर होणे महत्त्वाचे नसून समाज घडविणारा माणूस निर्माण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेसारख्या समाज उपयोगी उपक्रमांमधून विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक उत्तरदायित्वाची व माणुसकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. सागर वैद्य यांनी केले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित उद्बोधन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश भंडारी, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. सद्दाम घाटवाले, प्रा. अनुपमा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.उद्बोधन वर्गाचे प्रास्ताविक करत असताना प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी सदर कार्यक्रमाची संकल्पना व उद्देश सविस्तर स्पष्ट करत राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सद्दाम घाटवाले तर आभार प्रदर्शन डॉ. नागेश भंडारी यांनी केले. यशस्वितेसाठी प्रा. काजल कांबळे, प्रा. गणेश कटारिया, प्रा. रुपाली बनकर, प्रा. प्रियांका महाजन, प्रा.भाग्यश्री महाजन, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. प्रवीण खाडे, प्रा. सुनील वाघ यांनी परिश्रम घेतले असून प्रणित पावले यांनी विशेष सहकार्य केले.