पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी पुणे -१८ यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष २०२५-२६ जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे.ही स्पर्धा पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (दि. १५) सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार आहे. पिंपरी चिंचवड शहर, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगावतालुक्यातील, पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी २७ प्रकारांमध्ये विविध स्पर्धांत भाग घेऊन सहभागी होता येईल.
संगीत विभागात शास्त्रीय भारतीय गायन, टाळ वाद्य, स्वर वाद्य, सुगम संगीत भारतीय व पाश्चात्य, समूहगान, लोकसंगीत वाद्यवृंद याचा समावेश असेल. तसेच नृत्य प्रकारात लोक आदिवासी व शास्त्रीय भारतीय नृत्य रंगमंचीय कला विभागात एकांकिका प्रहसन, मूकनाट्य, नकला, ललित कला प्रकारात स्थळचित्र, चित्रकला, भित्तिचित्र, मातीकला, मेहंदी, रांगोळी आदी, तर वाङ्गय प्रकारात प्रश्नमंजूषा, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा यांचा समावेश आहे. एकूण प्रमुख पाच गटांमधून २० कलाप्रकारांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धेच्या दिवशी "स्पॉट एन्ट्री" (स्थळी नोंदणी) ची सुविधा उपलब्ध आहे.
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), श्री. अभिजित कुलकर्णी (संचालक, अतिरिक्त कार्यभार, विद्यार्थी विकास मंडळ), डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, प्राचार्य डॉ. रणजित पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नीता मोहिते, तसेच सांस्कृतिक समन्वयक डॉ. शैलेन्द्र कांबळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क उप प्राचार्य जयवंत बाबर +91 73505 43294
