सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; देवेंद्र फडणवीसांनी थेट केंद्र सरकारचं नाव घेतलं!
  • आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या, जरांगे-भुजबळांना बोलवा, जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
  • तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, छगन भुजबळांचं आव्हान
  • मराठा आरक्षण अडचणीत? राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल
  • मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरच्या GR बाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल; राज्य सरकारलाही विनंती
 DIGITAL PUNE NEWS

मुंबईतील घाटकोपरमध्ये पदपथावर झोपलेल्या तिघांना मोटारगाडीची धडक, दोन तरुणींसह तिघे ताब्यात

डिजिटल पुणे    13-09-2025 16:35:44

मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. एल.बी.एस. मार्गावर वेगाने धावणारी एक मोटारगाडी नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकली आणि थेट काही दुकानांवर जाऊन आदळली. या धडकेत पदपथावर झोपलेले तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाजवळ सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. अचानक आलेल्या गाडीने दुकानाच्या पायऱ्यांवर धडक दिली आणि त्या वेळी तेथे झोपलेले लोक तिच्या चपेटात आले. अपघात इतका भीषण होता की, काही दुकानांचेही नुकसान झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवून जखमींना रुग्णालयात हलवले.

प्रत्येक्षदर्शींच्या मते, गाडीमध्ये दोन तरुणी आणि एक तरुण होता. हे तिघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर पोलिसांनी गाडीतून बाहेर पडलेल्या तिघांना ताब्यात घेतले आहे.सध्या जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला असून, मद्यप्राशन करून वाहन चालवले का याची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती