सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; देवेंद्र फडणवीसांनी थेट केंद्र सरकारचं नाव घेतलं!
  • आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या, जरांगे-भुजबळांना बोलवा, जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
  • तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, छगन भुजबळांचं आव्हान
  • मराठा आरक्षण अडचणीत? राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल
  • मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरच्या GR बाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल; राज्य सरकारलाही विनंती
 शहर

पुण्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमाचे आयोजन

डिजिटल पुणे    13-09-2025 17:44:46

पुणे : गेली सतरा वर्षे पुण्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रम घेतला जातो यावर्षी देखील मराठवाडा समन्वय समिती पुणे च्या वतीने दि.१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५वा. बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगर पुणे येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे आयोजन केले असून यामध्ये ' मराठवाडा भूषण पुरस्कार' वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम राष्ट्रशाहीर सुरेशराव सुर्यवंशी आसंगीकर प्रस्तुत  'रणगाथा शौर्याची', वैभवशाली मराठवाडा २०२५' वार्षिक विशेषांकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन ,स्नेहभोजन आदी उपक्रमांचे आयोजन केले असल्याचे मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजस्थानचे राज्यपाल श्री.हरिभाऊ बागडे, प्रमुख अतिथी म्हणून  महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे , सन्माननीय उपस्थित म्हणून  छत्रपती संभाजीनगर महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव अंकुशराव कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

यंदाचे मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी सामाजिक पुरस्कार श्री. हरिश्चंद्र सुडे , शैक्षणिक पुरस्कार, सांस्कृतिक संवर्धन मंडळ सगरोळी जिल्हा नांदेड, पत्रकारिता पुरस्कार  श्री राहुल कुलकर्णी , प्रशासकीय पुरस्कार ओमप्रकाश यादव, कृषी पुरस्कार दत्तात्रय जाधव, उद्योजक पुरस्कार श्री राजेंद्र नारायणपुरे, यांना मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार आहेत. 

यावेळी पत्रकार परिषदेला मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष श्री.राजकुमार धुरगुडे पाटील, सचिव दत्ताजी मेहेत्रे, कोषाध्यक्ष ॲड. विलास राऊत , कार्यकारणी सदस्य  प्रभाकर चेडे, प्रसिद्धीप्रमुख धनराज गरड आदी सदस्य उपस्थित होते. मराठवाड्यातील सर्व नागरिक महिला भगिनींनी व युवकांनी मोठ्या संख्येने बालगंधर्व येथे उपस्थित राहण्याच्या आवाहन मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती