रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे 'एशिया कप' या क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथे पहलगाम घाटीत २६ निष्पाप लोकांची हत्या करण्यात केली होती.

या पार्श्वभूमीवर आता राजकीय लढाई पण सुरू झाली आहे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने सुद्धा हा शहिदांचा अपमान आहे असे सांगत या सामन्याला विरोध दर्शविला आहे.
' ज्या देशाने पहेलगाम येथे भारतीय २६ महिलांचे कुंकू पुसले त्याच दहशतवादी देशासोबत क्रिकेट खेळण्या मागे भाजपच्या मोदी सरकारची कोणती हतबलता, मजबुरी आहे? काही ठराविक आर्थिक हितसंबंधासाठी देशप्रेमाला तिलांजली आम्ही स्वीकारणार नाही.
आम्ही सर्वांना याचा तीव्र निषेध आणि बहिष्कार करण्याचे आवाहन करतो!' असे सांगत आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यामध्ये शिवाजीनगर मेट्रो चौकामध्ये पाकिस्तानी क्रिकेट चा टी-शर्ट जाळण्यात आला.
यावेळेस आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले,अनिकेत शिंदे,सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.